Share

संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात केवळ दोनच विठ्ठल

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा :मुंब्रा-कळवा येथील आयोजित कार्यक्रमात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत आव्हाड यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना खासदार संजय राऊत देखील उपस्थित होते.

यावेळी बोलताना संजय राउत म्हणाले कि, मी कार्यक्रमाला येताना पाहिलेल्या होर्डिंग्जवर भीष्म पितामह असे लिहिले होते. मला वाटतं यात काहीच गैर नाही. मी नेहमीच असे संदर्भ देत आलेलो आहे. कारण, बाळासाहेब आणि शरद पवार यांनीच चाळीतल्या पोरांना मंत्री बनवलंय. महाराष्ट्रात विठ्ठल किती, दोनच. एक म्हणजे शरद पवार आणि दुसरे बाळासाहेब हेच दोन विठ्ठल.’ अशा शब्दात राऊत यांनी शरद पवार आणि बाळासाहेबांबद्दल गौरव केला आहे.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राला दिशा देणारं नेतृत्व आहे. शरद पवारांवर आव्हाड यांचं खूप प्रेम आहे. प्रेयसीपेक्षाही जास्त प्रेम पवार यांच्यावर आहे. आमचंही शरद पवारांवर खूप प्रेम आहे. कदाचित तुमच्यापेक्षाही जास्त आहे, हे पवारसाहेबांना माहिती आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!