Share

ठाकरे सरकार कारवाई करताना गट, पक्ष पाहत नाही – संजय राऊत

Published On: 

मुंबई: महाराष्ट्रात राजकारण वेगळ्याच वळणावर जात असल्याचे अनेक महिन्यांपासून बघायला मिळत आहे. राजकीय पातळीवरून वयक्तिक पातळीवर देखील आता हे राजकारण सुरू झाले आहे. त्याच सोबत राज्यात सध्या अनेक घटना घडत आहेत ज्यामुळे राज्याचे वातावरण अस्थिर झाले आहे. अमरावती मध्ये झालेला हिंसाचार तसेच एसटी कामगारांचे आंदोलन यावरून चांगलेच राजकारण तापत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या संदर्भात माध्यमांशी संवाद साधला.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते. अमरावतीसारख्या घटना घडू नये म्हणून त्यांनी आगीत तेल न टाकता अशा घटना थांबाव्यात म्हणून काम करायला हवं, असा सल्ला देखील संजय राऊत यांनी दिला आहे.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्र हा दंगलीसाठी ओळखला जाऊ नये. हे कायद्याचे राज्य आहे. विदर्भात २६ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. कायदा सर्वांना समान आहे. अमरावतीत काय घडलं ते कुणी केलं ते देशाला माहिती आहे. गृहमंत्र्यांना आणि अमरावतीच्या जनतेला माहिती आहे. वातावरण शांत झालं असताना उगाचच कुणी काड्या करण्याचं काम करु नये, असं संजय राऊत म्हणाले.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यात ज्या काही सध्या घटना सुरू आहेत त्यावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांना हात घातला. त्याच सोबत हे सरकार पक्ष, गट, तट बघून कारवाया करत नाही, असेही ठणकाऊन सांगितले. हे ठाकरे सरकार आहे, इथं कायदेशीर कारवाई करताना गट तट पक्ष पाहिला जात नाही, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!