Share

चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले..

Published On: 

नवी दिल्ली: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांनी पंतप्रधान मोदींची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी (Chhatrapati Shivaji Mahara)करत वर्षानुवर्ष मेहनत घेऊन विकसित केलेली जी रोपवे आहेत, ती संत-महंता पर्यंत पोहचते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापर्यंत पोहचते. त्यांनीही हिंदुत्वाची व्होट बॅंक तयार केली. त्यात अलीकडच्या काळामध्ये अटलजी, अडवाणी आणि मोदी यांनी कळस चढविला. असे विधान केले आहे. यावरच आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रकांत पाटील काय म्हणतात यावर भूमिका ठरत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, असं संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच बाळासाहेब ठाकरे हे एकमेव नेते आहेत. या देशात हिंदूची वोट बँक आहे हा विचार बाळासाहेब ठाकरे यांनी मांडला. अयोध्येत बाबरीचं पतन होत असताना सध्याचे हिंदू वोट बँकवाले पळून गेले. मात्र शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख त्यावेळी ठामपणे उभे राहिले. बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांचा अभिमान असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

आमचं हिंदुत्व शेपूट घालणारे आणि पळपुटं नाही. आमचं हिंदुत्व लोकांना अन्न, वस्त्र, निवारा मिळावा यासंदर्भात जोडलेलं आहे. असे विधान संजय राऊत यांनी केले आहे. दरम्यान यावेळी राऊत यांनी पंतप्रधान मोदींच्या काशी यात्रेवरूनही टीका केली आहे. पंतप्रधानांच्या तीर्थयात्रा ठीक आहेत, पण देशाची जनता महागाईच्या मुद्यावर होरपळून निघाली आहे. राज्यसभेत आम्हाला बोलू देत नाहीत. पण या प्रश्नी संसदेत वादळी चर्चा होईल असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!