पुणे : गेल्या काही दिवसांपासून करोनाशी झुंज देत असलेले काँग्रेसचे नेते राजीव सातव यांचं निधन झालं आहे. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात मागील २० दिवसांपासून उपचार सुरू होते. सुरूवातील त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मात्र, नंतर त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली होती. मात्र, दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती पुन्हा खालावली होती. त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळासह सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.
राजीव सातव यांच्या निधनानंतर शिवसेना खासदार यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. ‘राजीव सातव तु हे काय केलेस? राष्ट्रीय राजकारणात तुझ्याकडून खुप अपेक्षा होत्या..तुझं हे असं जाणं भयंकर वेदनादायक आहे.. चार दिवसापूर्वीच विडिओ काॅलवर आपण निशब्द हाय हॅलो केले..लवकरच बाहेर येण्याची तुझी विजयी मुद्रा माझ्या डोळ्यासमोर आहे.. तुला श्रध्दांजली कोणत्या शब्दात वाहू?’ अस संजय राऊत म्हणाले आहे.
राजीव सातव तु हे काय केलेस? राष्ट्रीय राजकारणात तुझ्याकडून खुप अपेक्षा होत्या..तुझं हे असं जाणं भयंकर वेदनादायक आहे..
चार दिवसापूर्वीच विडिओ काॅलवर आपण निशब्द हाय हॅलो केले..लवकरच बाहेर येण्याची तुझी विजयी मुद्रा माझ्या डोळ्यासमोर आहे..
तुला श्रध्दांजली कोणत्या शब्दात वाहू? pic.twitter.com/dR0txA7JkS— Sanjay Raut (@rautsanjay61) May 16, 2021
राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र काही दिवसांपूर्वीच सताव यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यानंतर आता त्यांना न्युमोनिया झाल्याने त्यांची तब्बेत खालावली होती.
राजीव सातव यांच्या शरीरात सायटोमॅगीलो हा नवीन व्हायरस आढळला होता, त्यांच्या शरीरात इन्फेक्शन देखील झाले होते. या सर्व कारणाने प्रकृती नाजूक झाली होती, त्यांच्या उपचारासाठी तज्ञ डॉक्टरांचे पथक तैनात करण्यात आले होते. मात्र अखेर राजीव सातव हे कोरोन विरुद्ध लढाई हरले.
महत्वाच्या बातम्या
- इंग्लंड मालिकेआधी भारतीय संघाच्या ‘या’ खेळाडूची भरली बटलरच्या मनात धडकी
- सेहवागने केली पंजाबच्या शाहरुखची किरॉन पोलार्डसोबत तुलना, म्हणाला…
- मोठी बातमी : कॉंग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन
- ‘आपल्या प्रियजणांना घट्ट पकडून ठेवा’ ; आई वडिलांचा फोटो शेअर करत चहलची भावूक पोस्ट
- कोरोना संसर्गामुळे श्रीलंका दौऱ्यावर प्रश्नचिन्ह! दौरा रद्द होण्याची शक्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

