Share

इंग्लंड मालिकेआधी भारतीय संघाच्या ‘या’ खेळाडूची भरली बटलरच्या मनात धडकी

Published On: 

मुंबई : आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर बीसीसीआयने भारतीय संघाची इंग्लंड दौऱ्यासाठी घोषणा केली. या दौऱ्यात पहिले भारतीय संघ जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळेल. १८ ते २२ जुनदरम्यान साउथहॅप्मटन येथे भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान ही लढत होईल. यानंतर ऑगस्ट महिन्यात इंग्लंड संघासोबत ५ कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेला अजुन २ महिन्याचा अवकाश आहे. मात्र आत्ताच इंग्लंड संघाचा यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलरने भारतीय संघाचा युवा खेळाडू रिषभ पंतबद्दल मोठा खुलासा केला आहे. पंत विषयी बोलताना बटलर म्हणाला की, ‘भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत हा एक असा खेळाडू आहे, ज्याच्याविरुद्ध मी खेळु इच्छित नाही. कारण त्याच्यामध्ये अफाट क्षमता आहे. पंत कोणत्याही क्षणी सामना विरोधी संघाकडून खेचू शकतो.’ असे बटलर म्हणाला.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रिषभ पंतने अत्यंत कठिण परिस्थीतीत फलंदाजी करत भारतीय संघाला संकटातुन बाहेर काढत विजयाच्या दारात पोहोचवले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने तुफान फटकेबाजी करत भारताच्या विजयात मोलाची भूमिका निभावली होती. आखेरच्या कसोटी सामन्यात नाबाद ८९ धावांची खेळी करत त्याने भारताला ३२ वर्षानंतर गाबावर विजय मिळवुन दिला होता. त्यानंतर मायदेशात इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत उल्लेखनीय कामगिरी करत १ शतक आणि २ अर्धशतक झळकावले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!