टीम महाराष्ट्र देशा- लोकसभा नव्याने अस्तित्वात आली आहे. त्यामुळे आता राम मंदिराचं काम मार्गी लागेल, अशी आशा खा. संजय राऊत यांनी व्यक्त केली. राम मंदिर पूर्णत्वास गेलं नाही आणि तिसरी निवडणूक या मुद्द्यावरून लढावयास लागली तर जनता जोडे मारल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील राऊत यांनी भाजपला दिला आहे.
भाजपाकडे ३०३ खासदार आहेत, शिवसेनेकडे १८ खासदार आहेत. तर एनडीएकडे ३५० हून अधिक संख्याबळ आहे. त्यामुळे राम मंदिर पुनर्निर्माणासाठी आणखी काय हवं आहे, तरीही यंदाच्या निवडणुकीत राम मंदिर पूर्णत्वास गेलं नाही आणि तिसरी निवडणूक या मुद्द्यावरून लढावयास लागली तर जनता जोडे मारल्याशिवाय राहणार नसल्याचा उल्लेखही संजय राऊत यांनी केला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

