🕒 1 min read
औरंगाबाद : आतापर्यंत घेण्यात आलेल्या सर्व एमपीएससी परीक्षांची पूर्तता करावी. तसेच शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार आयोगाच्या सदस्यांच्या रिक्त जागांवर ३१ जुलै पर्यंत भरती करण्यात यावी. आणखी स्वप्निल लोणकर होऊ नयेत यासाठी यासाठी डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय), फेडरेशन ऑफ स्टुडंट्स इंडिया (एसएफआय) च्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शुक्रवारी (दि.९) आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या परीक्षा, मुलाखती, आयोगावरील सदस्यांच्या रखडलेल्या नेमणुका यामुळे विविध सेवांसाठी अर्हताप्राप्त असलेल्या लाखो उमेदवारांचे भवितव्य अंधारात आहे. तीन वर्षांपासून राज्यसेवा परीक्षा-२०१९ बरोबरच स्थापत्य अभियांत्रिकी, पशुधन विकास अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी अशा २९९६ पदांसाठी हजारो उमेदवारांच्या मुलाखती आणि मुख्य परीक्षा रखडल्या आहेत. एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही २ वर्षे मुलाखत झालीच नाही. आणि स्वप्निल हळूहळू नैराश्यात जाऊन त्याने आत्महत्या केली.
स्थापत्य अभियांत्रिकी सेवेच्या ११४५ पदांसाठी जून २०१९ मध्ये पूर्वपरीक्षा, तर नोव्हेंबर २०१९ मध्ये मुख्य परीक्षा झाली. तब्बल आठ महिन्यांनी जुलै २०२० मध्ये मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर होऊनही ३६०० उमेदवार वर्षभरापासून मुलाखतीच्या प्रतीक्षेत आहेत. सरळसेवेतून भरल्या जाणाऱ्या ४३५ पशुधन विकास अधिकारी पदासाठी २२ डिसेंबर २०१९ रोजी परीक्षा घेण्यात आली. मात्र, दीड वर्षांपासून परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या १३०० उमेदवारांच्याही मुलाखती घेतलेल्या नाहीत.
राज्य सरकार या मुलाखती, नियुक्त्यांची प्रक्रिया सातत्याने पुढे ढकलत आहे. त्यामुळे आंदोलन करून त्वरित एमपीएससीच्या जागा भराव्यात अशी मागणी यावेळी केली. तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गातून काढून टाकू नये. तसेच सरकारी विभागातील सर्व भरत्या एमपीएससीच्या माध्यमातून कराव्यात. शासकीय विभागातील भरतीसाठी महापोर्टल बंद करावे, विविध सरकारी विभागांमधील सर्व रिक्त जागा घोषित कराव्यात. भरतीप्रक्रिया पारदर्शकतेने पूर्ण झाली पाहिजे. याशिवाय खासगी शाळांमध्ये ५० टक्के फी कमी करावी. अशा मागण्या नितीन वावळे , लोकेश कांबळे, सत्यजित म्हस्के आदींच्या वतीने करण्यात आल्या.
महत्त्वाच्या बातम्या
- खडसेंना चौकशीला बोलावल्याने राष्ट्रवादी आक्रमक; भुजबळ, मलिक, जयंत पाटलांचा भाजपवर हल्लाबोल
- ‘दुर्दैवाने तिच्या मृत्युची बातमी मला समजली’; अनुपम खेर यांची भावूक पोस्ट
- कोर्टाला सांगितले ‘मी आजारी आहे’, अन् तिकडे खा. प्रज्ञा ठाकूर लग्नात नाचल्या
- ‘शो’ सुरु होण्याआधीच चाहत्यांची उत्सुकता पोहचली शिगेला; ‘या’ कलाकारांच्या नावाची होतेयं चर्चा
- ‘…तरीही त्यांनी माझ्यासाठी बरेच काही केले’; शगुफ्ताने मानले रोहित शेट्टीचे आभार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
