🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर रविवारी ट्विट टीका केली होती. अमृता फडणवीस यांनी या ट्विटमध्ये ‘फक्त आडनाव ठाकरे असून चालत नाही’ अशी बोचरी टीका करत CM ठाकरेंवर निशाणा साधला होता.
याच पार्श्वभूमीवर शिवसेनेला खासदार संजय राऊत भाष्य केलं आहे. ‘मी अमृता फडणवीस यांचं ट्वीट वाचलेलं नाही, मला माहिती नाही. मात्र अमृता फडणवीस यांना शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्याच उत्तर देतील, असे राऊत यावेळी बोलताना म्हणाले. झारखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. यावरुन खा. संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
तसेच पुढे ते म्हणाले, आधी महाराष्ट्र आता झारखंड या दोन्ही राज्यात भाजपला दणका बसल्याने आता भाजप श्रेष्ठींनी आत्मपरीक्षण करावे, असा टोला शिवसेना खा. संजय राऊत यांनी लगावला. झारखंड विधानसभा निवडणुकीत ८१ जागांपैकी ४२ जागांवर कॉंग्रेसने आघाडी घेतली आहे. तर २९ जागांवर भाजप आघाडीवर आहे.
दरम्यान झारखंडमधील सत्ता कायम राखण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनी संपूर्ण ताकद लावली होती. सुधारित नागरिकत्व कायदा आणून वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न भाजपानं करुन पाहिला. मात्र मोदी-शहांचे प्रयत्न वाया गेले. झारखंडमधील जनतेनं भाजपाला नाकारलं. महाराष्ट्रापाठोपाठ आता झारखंडदेखील भाजपाच्या हातातून निसटलं आहे. भाजपानं याचं आत्मचिंतन करावं, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1209038628262838272?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1209035692493262848?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
