Share

मोठी बातमी : संजय राऊत राज्यपालांच्या भेटीला, ‘हे’ होते भेटीचे कारण…

Published On: 

मुंबई : भाजप नेते राज्यपालांच्या भेटीला राजभवनावर सारखे जात असतानाच्या बातम्या आपण अनेकदा ऐकल्या वाचल्या. मात्र आता शिवसेना खा. संजय राऊत हे आज राज्यपालांच्या भेटीला गेले होते. या भेटीबाबत राऊतांनी स्पष्टीकरण दिले. ही सदिच्छा भेट होती. बरेच दिवस राज्यपालांशी भेट झाली नव्हती. त्यामुळे आज भेटलो, असे ते म्हणाले.

नेमकं राऊत म्हणाले की, राज्यपाल हे आमचे मार्गदर्शक आहेत, खूप दिवस व्यक्तीशा भेटलो नव्हतो, बऱ्याच दिवसापासून भेट राहिली होती, त्यामुळे सदिच्छा भेट घेतली. तसेच राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध मधुर आहेत, एखाद्या पिता-पुत्राने त्यांचे संबंधत आहेत, तसेच राहावेत, दऱ्या वगैरे आमच्यात काही पडत नाहीत, असेही राऊत म्हणाले. विरोधी पक्षांना आंदोलनाचा अधिकार आहे, मात्र सध्या देश, महाराष्ट्रात जे संकट आहे, अशावेळी विरोधकांनी सरकारसोबत उभं राहायला हवं, त्यांनी मुख्यमंत्र्यांशी जाऊन थेट बातचीत करायला हवी, असे देखील राऊत म्हणाले.

दरम्यान संजय राऊत यांनी आपल्या लेखणीतून विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेस विरोधी पक्ष भाजप आणि राज्यपाल यांना चांगलेच धारेवर धरले होते. मात्र आता खुद्द संजय राऊत स्वतः राज्यपालांच्या भेटीला गेले आहेत.गेले दोन महिने राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात चांगलीच जुंपल्याचं चित्र निर्माण झालं होतं. यामध्ये संजय राऊतांनी आपल्या लेखणीतून विरोधी पक्षावर शाब्दिक फटकारे मारले होते. तर राज्यपालांचा व्यवहार हा पारदर्शी आहे. त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. ते कोणतेही चुकीचे पाऊल उचलणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.

तसेच भाजप नेते हे वारंवार राज्यपालांच्या भेटीला जात असतात. यावर संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला होता. राजभवनाच्या दारात लोळण घेण्यापेक्षा राज्य सरकारला कोरोना काळात मदत केली तर चांगले होईल, असे राऊत म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या 

#lockdown : विमानतळ प्रशासनाच्या प्रवाशांसाठी नव्या सूचना…

#महाराष्ट्रद्रोहीBJP विरुद्ध #MaharashtraBachao जाणून घ्या ट्वीटर वॉर मध्ये कुणी मारली बाजी

खबरदार… कोरोनाबाबत असहकार्य केले तर कारवाई होणार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!