Share

#lockdown : विमानतळ प्रशासनाच्या प्रवाशांसाठी नव्या सूचना…

Published On: 

मुंबई : कोरोना विषाणूने देशभरात हाहाकार मजला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देशात सध्या लॉकडाऊनचा ४था टप्पा सुरु आहे. मात्र तरी देखील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना पाहायला मिळत आहे.

लॉकडाऊनच्या या कालावधीमध्ये सर्व ठप्प आहे. रेल्वे वाहतूक, रस्ते, अत्यावश्यक सेवा सोडता बाकी सर्व घटकांना लॉकडाऊनचा फटका बसला आहे. यातच आता सर्व खबरदारी घेत विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) गुरुवारी प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये विमानतळ प्राधिकरणाने 25 मेपासून देशांतर्गत उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच प्रवाशांनी त्यांच्या मोबाईलवर आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करून ठेवणे बंधनकारक केले आहे.

वाचा विमानतळ प्रशासनाच्या प्रवाशांसाठी नव्या सूचना…

सर्व प्रवाशांनी मास्क आणि हातमोजे घालणे आवश्यक आहे. प्रवाशांना थर्मल स्क्रीनिंग करावी लागणार आहे. तसेच प्रवाशांच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू ऍप असणे महत्त्वाचे आहे. यामध्ये 14 वर्षांखालील मुलांना आरोग्य सेतू अ‍ॅपमधून सूट देण्यात आली आहे.

तसेच प्रवाशांनी विमान सुटण्याच्या वेळेच्या दोन तास आधी पोहोचले पाहिजे. ज्यांची उड्डाणे चार तासांच्या आत असतील, त्या प्रवाशांना टर्मिनल इमारतीत जाण्याची परवानगी देण्यात येईल. जर त्यांच्याकडे ‘ग्रीन’ पर्याय दिसत नसेल किंवा त्यांच्याकडे शासकीय संपर्क ट्रेसिंग अ‍ॅप नसेल तर त्यांना प्रवास करण्यास परवानगी दिली जाणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या 

मुंबई आणि महाराष्ट्राला केंद्राकडून सतत सावत्रभावाची वागणूक दिली जातीये – यशोमती ठाकूर

#राजकारण : पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कॉंग्रेसच्या बैठकीला हजर राहणार

केंद्राने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजवर देवेंद्र फडणवीसांचा विश्वास नाही का ? : पाटील

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!