Share

संजय राऊत रोज जोकरसारखे स्टेटमेंट करतात – देवेंद्र फडणवीस

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि शिवसेना यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे. शिवसेना खासदार संजय राऊत सातत्याने भाजपवर हल्लाबोल करत आहेत. आता त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. दोन दिवस अंमलबजावणी संचालनालयाची कमान महाराष्ट्र सरकारकडे दिल्यास देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील, असेही ते म्हणाले होते.

दरम्यान, संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी खोचक टोला लगावला आहे. असले जोकर सारखे स्टेटमेंट संजय राऊत रोजच करत असतात, असे फडणवीस म्हणाले.

चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना टोला

“या जगात प्रत्येक गोष्ट कष्टाने कमवावी लागते. भीक मागून काहीच मिळत नाही. ED तर मुळीच नाही”, असे ट्वीट करत चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर खोचक टीका केली आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत

“आमदारांबद्दल आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या, त्यांच्या अपमान करण्याचा आमचा मानस नाही. आमच्या हातात २ दिवस ईडी दिलं तर फडणवीससुद्धा शिवसेनेला मतदान करतील,” असे संजय राऊत म्हणाले होते. 

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!