मुंबई : अनेक कलाकार स्वतःला फिट ठेवण्यासाठी फक्त आहारच चांगला घेत नाहीत तर, जिममध्ये देखील त्यांच्या वेळ घालवत असतात. नुकतिचं आश्रम ३ मधील बोल्डनेसच्या सीमा ओलांडणारी अभिनेत्री ईशा गुप्ता याबाबत चर्चेत आली आहे. ईशा गुप्ताने जिममध्ये व्यायाम करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तो व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये ईशा गुप्ता कधी जिममध्ये ट्रेडमिलवर धावताना दिसत आहे तर कधी इतर वर्कआउट करताना दिसत आहे. फिगर परफेक्ट राहण्यासाठी कलाकार किती मेहनत घेतात याच उत्तम उदाहरण म्हणजे ईशा गुप्ताचा व्हिडीओ. ईशा गुप्ता व्हिडीओमध्ये खूपच हॉट दिसत आहे. ईशाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये बॅकग्राऊंडला पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची गाणी वाजत आहेत
https://www.instagram.com/p/CevCnMrpHfP/
ईशा गुप्ता नुकतीच ‘आश्रम 3’ मध्ये सोनियाच्या भूमिकेत दिसली होती. या वेब सीरिजमध्ये ईशा गुप्ताने बॉबी देओलसोबत बरेच इंटिमेट सीन्स दिले होते. हे सीन्स इतके बोल्ड होते की त्यांचे स्क्रीनशॉटही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.
महत्वाच्या बातम्या :


