मुंबई:- शिवसेनेचे दिग्गज नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवली आहे. वर्षा राऊत यांनी पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली. भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरलेले दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्यापाठोपाठ वर्षा राऊत यांनाही ईडीची नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटिस आल्यानंतर संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेत भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला भाजप नेते आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत बिथरले, हादरले आणि घाबरले आहेत. त्यामुळे त्यांचं विधान आता जनताही गांभीर्याने घेत नाही. शेलार यांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली आहे.
आगामी मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी यबाबत माहिती दिली आहे. मात्र, काँग्रेसच्या याच निर्णयावर भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे. महापौराच्या गप्पा मारणे खूप मोठी गोष्ट आहे. महापालिकेत आज विरोधीनेतेपद शिवसेनेच्या जीवावर मिळालं आहे. त्यामुळे त्यांनी आधी आत्मपरीक्षण करावं, असा चिमटा शेलार यांनी काढला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘माझी मुंबई, माझी काँग्रेस’; स्वबळावर लढण्यावर काँग्रेस ठाम !
- भारताचा ऑस्ट्रेलियावर ‘अजिंक्य’ विजय; कोहलीचे खास ट्विट
- ७ जानेवारीला होणार लाँच ह्युंदाई ट्यूसॉन आणि स्कोडा कारॉक ला टक्कर देणारी ‘ही’ कार
- ‘द फॅमिली मॅन सीझन 2’चे पोस्टर प्रदर्शित
- उद्या मागण्या मान्य न झाल्यास प्रजासत्ताक दिन दिल्लीतच साजरा करणार; शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका

