मुंबई: मोहित कंबोज यांनी संजय राऊतांवर मोठा आरोप केला आहे. म्हणाले, “शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माझ्याकडून २५ लाख रुपये उकळले होते, मला हे पैसे व्याजासकट परत देणार होते. पण माझे ते पैसे आजपर्यंत त्यांनी परत दिलेले नाहीत. मी राऊतांना धनादेशाद्वारे २५ लाख दिले होते. या धनादेशाचे तपशील आणि इतर पुरावे द्यायला मी तयार आहे. याआधारे मुंबई पोलीस संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करायला तयार आहेत का”, असा सवालही कंबोज यांनी केला.
मोहित कंबोज यांनी गुरुवारी एक व्हीडिओ ट्विट करून याविषयी माहिती दिली. यामध्ये मोहित कंबोज म्हणाले, “२०१४ साली संजय राऊत यांनी मला ‘सामना’च्या कार्यालयात बोलावून धमकावले. त्यावेळी संजय राऊत यांनी माझ्याकडून २५ लाख रुपये घेतले. हे पैसे संजय राऊत मला व्याजासकट परत करणार होते. पण आजपर्यंत त्यांनी हे पैसे परत केलेले नाहीत”.
म्हणून संजय राऊतांवर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करावा. आयएनएस विक्रांत प्रकरणात पोलिसांनी किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल केला. मग आता माझीही तक्रार पोलीस दाखल करुन घेणार का नाही? याचे उत्तर आयुक्त संजय पांडे यांनी द्यावे, असेही कंबोज म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
“ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका संशयास्पद” – गोपीचंद पडळकर
IPL 2022 : “माझ्यासाठी धोनीला माहीभाई म्हणणं अवघड होतं”, चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूचा खुलासा!
परवानगी मिळाली नाही तर रस्त्यावरच टेबल टाकून राज ठाकरे यांची सभा घेणार – बाळा नांदगावकर
IPL 2022 : महेंद्रसिंह धोनीच्या ‘या’ जाहिरातीवर बंदी..! काय आहे कारण? जाणून घ्या
“मेरे अंगणे मे तुम्हारा क्या काम है” म्हणत शालिनी ठाकरेंचा सुजात आंबेडकरांवर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

