🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा – राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून शिवसेनचे खासदार संजय राउत यांनी भाजपला धारेवर धरलेले आहे. त्यांनी वारंवार मुख्यमंत्री शिवसेनेचाचं होणार अशी मागणी केली आहे. तसेच कधी पत्रकार परिषदेच्या तर कधी सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
संजय राउत यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी लोक उगाच अहंकार आणि गर्वाने वागतात तेव्हा मला अझीज भाइची ही कव्वाली आठवते…जैसी करनी वैसी भरनी आज किया कल पायेगा सरको उठाकर चलनेवाले एक दिन ठोकर खायेगा चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा |
याद रख सिकन्दर के हौसले तो आली थे जब गया था दुनिया से दोनो हाथ खाली थे अब ना वो हलाकू है और ना उसके साथी हैं जंग जो न कोरस है और न उसके हाथी हैं कल जो तनके चलते थे अपनी शान-ओ-शौकत पर शमा तक नही जलती आज उनकी तुरबत पर ही कव्वाली पोस्ट केली आहे.
संजय राउत यांना या पोस्टमधून नेमकं काय सुचवायचं हे मात्र स्पष्ट होत नाही मात्र सध्या सुरु असलेल्या राजकीय परिस्थितीचा संबंध लावता त्यांनी हा टोला भाजपला लगावला असावा असं प्रतीत होत आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1192653452859461633?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1192651365060726785?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1192644695710523393?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
