🕒 1 min read
Sanjay Raut | मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून राज्यातील वातावरण तापलेलं आहे. अशातच र्नाटकातील बेळगाव येथील बागेवाडी येथे मंगळवारी कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक केली. या प्रकरणी पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. दुसरीकडे तणावाच्या भीतीने महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांनी बेळगावचा दौरा रद्द केला. यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली.
संजय राऊत म्हणाले, “शिंदे असतील किंवा फडणवीस, कारभार कुणाच्याही नावाने चालू द्या. महाराष्ट्राच्या अस्मितेचं, सार्वजनिक मालमत्तेचं, जमिनीचं रक्षण करण्यात हे सरकार अपयशी ठरलं आहे. सरकारला एकही दिवस सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही हे त्यांनी मान्य करायला हवं.”
“सीमाभागात २४ तासांपासून सरकारी प्रेरणेनं महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड होतेय, हल्ले होतायत आणि प्रतिकार करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना घरात घुसून तुरुंगात डांबलं जातंय. महाराष्ट्र सरकार आहे की नाही?” असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.
पुढे ते म्हणाले, “अशा प्रकारची वेळ यापूर्वी कधी आली नव्हती. दोन मंत्र्यांनी काल शेपूट घातलं. डरपोक सरकार आहे, महाराष्ट्राच्या जनतेची काळजी नाही सीमा कुरतडल्या जात आहेत. हे सरकार नामर्दासारखं बसलेलं आहे. जेव्हा जेव्हा महाराष्ट्राववर असं संकट आलं आहे तेव्हा विरोधी पक्षाने लढाई केली आहे.” तसेच महाराष्ट्राचे लचके सहजपणे तोडता यावे म्हणुन शिवसेनेचे सरकार घालवलं आहे, असा घणाघातही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलाय.
महत्वाच्या बातम्या :
- Shambhuraj Desai | “संजय राऊत तोंड आवरा, पुन्हा आराम करायची वेळ..”; शंभूराज देसाईंची सडकून टीका
- Akshay Kumar | अक्षय कुमारच्या छत्रपतींच्या भूमिकेला नेटकऱ्यांचा विरोध, म्हणाले…
- Skin Care Tips | चेहऱ्यावरील पांढरे डाग दूर करायचे असतील, तर करा ‘हे’ घरगुती उपाय
- Udyanaraje Bhosale | “प्रत्येकाची बुद्धी…”; ‘त्या’ वक्तव्यावरून उदयनराजेंचा शिवेंद्रसिंहराजेंवर पलटवार
- Sanjay Raut | “दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला शक्य नाही”; संजय राऊतांचे गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
