Share

Sanjay Raut | “भाजपाचं डोकं फिरलंय, शिवरायांची भवानी तलवारच एक दिवस…”; ‘त्या’ प्रकरणावरून संजय राऊत संतापले 

Published On: 

Sanjay Raut | नाशिक : अनेक नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे. अशातच भाजपचे नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असल्याचं वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलं आहे. प्रसाद लाड यांच्या या विधानानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

‘महाराजांचा जन्म कुठे झाला हे अख्या जगाला माहित आहे. हे नवीन नवीन शोध लावत आहे. यांनी इतिहास मंडळाची नव्याने स्थापना केली आहे का? ज्याप्रमाणे मुख्यमंत्री शिंदे यांनी निती आयोगाची नव्याने स्थापना करून, त्यांच्या बिल्डर मित्राची वर्णी लावली. त्याप्रमाणे भाजपने इतिहास मंडळाची स्थापना करून लाड ग्वाड बोलत आहे, हे आता महाराष्ट्राचा नवीन इतिहास लिहिणार का?, अशी टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलीय.

‘कोण प्रसाद लाड, ते काय दत्तू मामा पोतदार आहे का, यदुनाथ सरकार आहे का, मुळात भाजपचं डोकं फिरलं आहे. रोज नवे विधानं केली जात आहे. या भाजपाचं डोकं फिरलंय. छत्रपती शिवाजी महाराजांची जी शक्ती आहे, ती शक्तीच यांना संपवेल. छत्रपती शिवाजी महाराज यांची जी भवानी तलवार आहे ना, एक दिवस त्या तलवारीने यांचे मुंडक छाटणार आहे. असं वाटतंय की यांच्या स्वप्नात अफजल खान आणि औरंगजेब येतो, यांच्या कानात काहीतरी मंत्र देतात आणि हे बोलतात यांची लायकी आहे का? असा संतप्त सवाल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.

जे लोक शिवाजी महाराज यांच्याविषयी अभद्र भाषा वापरतात, ते शिवसेनेवर काहीही बोलू शकतात. ते शिवसेनेविषयी अशीच भाषा वापरणार, जे छत्रपतींना सोडत नाही, ते आम्हाला काय सोडणार, आम्हाला कुणाला डिवचण्याची हिंमत नाही, असा इशाराही राऊतांनी यावेळी बोलताना दिलाय.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!