Share

Raj Thackeray | प्रसाद लाड यांच्या शिवरायांवरील विधानानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले,

Published On: 

🕒 1 min read

Raj Thackeray | रत्नागिरी : एकीकडे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहेत. त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. अशातच, भाजपच्या आणखी एका नेत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मासदंर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावरून राजकीय वातावरण तापलेलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असल्याचं वक्तव्य प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केलं आहे. प्रसाद लाड यांच्या या विधानानंतर  मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. आज रत्नागिरीत असताना त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलीय.

“शिवाजी महाराजांकडून काही घेऊ नका. जे महाराजांनी सांगितलं, जे महाराजांनी शिकवलं, त्या गोष्टी शिकायचं नाही. फक्त नको ते वाद करत बसायचे. एवढच सध्या सुरू आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्याचबरोबर  बेरोजगारी, शिक्षण आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष विचलीत करण्यासाठी नको ते विषय काढले जातात, असेही ते म्हणाले.

प्रसाद लाड यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भाजपावर टीका केली आहे. “सकाळ झाली भाजपाचे लोक एक बेताल व्यक्तव्य करत आहेत. प्रसाद लाड यांनी नवा जावई शोध लावला आहे. शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्यावर झाला. शिवरायांची राजधानी रायगड होती, असे आम्ही वाचत आलो आहोत. मात्र लाड म्हणत आहेत की शिवरायांचा जन्म कोकणात झाला. विशेष म्हणजे ते स्क्रीप्ट वाचून असे सांगत आहेत”, असा आरोप करत अमोल मिटकरी यांनी भाजपला टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!