मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण येत्या रविवारपासून समाज माध्यम अर्थात सोशल मिडिया वरून आपले सर्व अकाऊंट वापरणं सोडून देण्याबद्दल विचार करत असल्याचं ट्विटरवरून जाहीर केलं आहे.
२०१४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयात सोशल मिडीयाचा मोठा वाट आहे असा सर्वच विश्लेषकांनी मान्य केलं आहे. परंतु आता नरेंद्र मोदी हेच मध्यम सोडणार अशी माहिती त्यांनी स्वताच जाहीर केल्याने अनेक चर्चांना उधान आलं आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत त्यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे. याबाबत ते एका मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया सोडलं तर त्यांचे चाहते अनाथ होतील; अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे. सोशल मीडियाचा गैरवापर वाढला असल्याचं देखील राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, मोदी यांनी आपल्या ट्विट मध्ये आपण फेसबुक , ट्विटर , इंस्टाग्राम आणि यु ट्यूब ही सर्व माध्यमे वापरणं बंद करण्याचा विचार करत असल्याच म्हटलं आहे. याबाबत आपण रविवारी कळवू असही त्यांनी म्हटलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते लिहतात,’या रविवारी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर माझे सोशल मीडिया अकाउंट्स सोडून देण्याचा विचार आहे. आपण सर्वांशी संपर्क राहिलं.’


