Share

मध्यस्थीसाठी आमच्याकडे येऊ नये, राऊतांनी भिडेंना सुनावले 

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या गोंधळाची परिस्थिती आहे. सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि शिवसेनेत मतभेद आहेत. त्यामुळे संपूर्ण देशात महाराष्ट्राची चर्चा आहे. शिवसेना भाजपमधील मतभेद मिटवण्यासाठी दोनही पक्षातील नेते पुढाकार घेताना दिसत आहेत.

याच पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे प्रमुख संभाजी भिडे हे उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर आले होते. मात्र उद्धव ठाकरे मातोश्रीवर नसल्याने संभाजी भिडे यांची भेट झाली नाही. संभाजी भिडे जवळपास २० मिनिटे मातोश्रीवर थांबले होते. मात्र उद्धव ठाकरे मातोश्रीवर न परतल्याने त्या दोघांची भेट होऊ शकली नाही.

याविषयी संजय राउत यांनी भाष्य केले आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंचा कथित आणि तथाकथित मध्यस्थांना निरोप आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारच्या मध्यस्थीसाठी आमच्याकडे येऊ नये असं विधान केले आहे. त्यामुळे संभाजी भिडे यांच्यासह इतर अनेक मध्यस्थांना फटकारले आहे.

दरम्यान, संभाजी भिडे आणि उद्धव ठाकरे यांची भेट न होऊ शकल्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्वीट केले आहे, त्यात त्यांनी ‘आजच्या दिवसातील सर्वात आनंदाची बातमी उद्धव ठाकरे साहेबानी भिडेला भेट नाकारली #वाभाईवा’ असं विधान करत भिडे यांची खिल्ली उडवली आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1192683292845199360?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1192681340354711554?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1192676946502488065?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!