टीम महाराष्ट्र देशा – राज्यातील विधानसभा निवडणूक जरी पार पडली असली तरी सत्ता कोण स्थापन करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. भाजप शिवसेना युतीमध्ये मुख्यमंत्रीपदाविषयी तिढा निर्माण झाला आहे. शिवसेना मुख्यमंत्रीपदावर दावा करत असताना दिसत आहे. तर भाजप मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार नसल्याचं चित्र आहे.
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी भाजपला टोला लगावला आहे. त्यांनी ‘ज्यांच्याकडे बहुमत नाही त्यांनी भलतं धाडस करून नये, असं विधान केले आहे. तसेच पुढे बोलताना शिवसेनेने जर ठरवलं तर बहुमत सिद्ध करू शकते असंही ते म्हणाले आहेत.
संजय राऊत यांनी पुढे बोलताना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठींब्याविषयी सूचक विधान केले आहे. तसेच जनतेचे ही इच्छा आहे की शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा असंही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे युती होणार की शिवसेना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर सत्ता स्थापन करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.
दरम्यान, शिवसेनेला सत्तेत सामाविष्ट करण्यासाठी भाजपने जास्तीची मंत्रिपदे देऊ केली आहेत. त्यात उपमुख्यमंत्रीपदासह ८ कॅबिनेट आणि ८ राज्यमंत्रीपदे देण्यात येतील. गेल्यावेळपेक्षा शिवसेनेला दोन मंत्रिपदे जास्त मिळणार आहेत. याशिवाय, केंद्रातही शिवसेनेला आणखी एक मंत्रिपद वाढवून मिळेल. तर भाजप स्वत:कडे २३ मंत्रिपदे ठेवेल, अशी अटकळ आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1190126369650266112?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1190125962739863553?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1190123359582838785?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

