🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा – राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून शिवसेनचे खासदार संजय राउत यांनी भाजपला धारेवर धरलेले आहे. त्यांनी वारंवार मुख्यमंत्री शिवसेनेचाचं होणार अशी मागणी केली आहे. तसेच कधी पत्रकार परिषदेच्या तर कधी ट्वीटरच्या माध्यमातून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
राज्यातील सत्तासंघर्षावर शिवसेना-भाजपमध्ये मध्यस्थी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. यात राज्यातील सत्ता स्थापनेविषयी चर्चा झाली. त्यामुळे राज्य स्तरावरील वाद आता राष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. या भेटीनंतर सत्तास्थापनेबाबत तोडगा निघतो का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या या भेटीवर संजय राउत यांनी भाष्य केले आहे. त्यांनी नितीन गडकरी असोत की देवेंद्र फडणवीस दोघे आमच्यासाठी सारखेच आहेत असं विधान केले आहे. त्यामुळे नितीन गडकरींनी जरी मध्यस्थी केली तरीही काहीच निष्पन्न होणार नाही असं राउतांचा सूर असल्याचे जाणवत आहे.
दरम्यान नितीन गडकरींना भेटण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची बैठक झाली. या बैठकीत जवळपास अर्ध्या तासाहून अधिक वेळ चर्चा झाली आहे. मात्र यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीबद्दल प्रसारमाध्यमांना काहीही माहिती देण्यास नकार देत कमालीची चुप्पी साधली आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1191605757856210944?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1191604432829468672?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1191603355199492096?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
