Share

“केंद्र सरकारला विरोधकांचे भय सोडाच, पण आदरही नाही”

Published On: 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांच्या काशी दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाची मालिका बघायला मिळाली. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी देखील आपल्या सामना रोखठोकच्या माध्यमातून याविषयी भाष्य केले आहे.

लेखात राऊत म्हणाले की,’आपले पंतप्रधान मोदी यांना गंगेने साद घातली म्हणून ते काशीला गेले व तेथेच रमले, पण संसद सुरू होऊन १४ दिवस झाले तरी ते संसदेत फिरकले नाहीत. याचे कारण म्हणजे संसदेत आज सक्षम विरोधी पक्ष नाही. केंद्र सरकारला विरोधकांचे भय सोडाच, पण आदरही नाही. गुलाब नबी आझाद हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून निवृत्त झाले तेव्हा पंतप्रधान मोदी व्याकूळ झाले व रडले,पण त्यांच्या जागी आलेल्या मल्लिकार्जुन खरगे यांचे ऐकायचे नाही ही सरकारची भूमिका नको तितक्या हटवादीपणाची आहे. हा वैचारिक क्षुद्रपणा आहे. कालपर्यंत ज्या मूल्यांचा ते स्वतः उद्घोष करीत होते तीच त्यांनी पायदळी तुडवली आहेत.’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’लोकसभेत अजय मिश्रा टेनी या गृहराज्यमंत्र्याचा राजीनामा मागण्यासाठी विरोधक वेलमध्ये उतरले. लखीमपूर खेरीत ज्या शेतकऱ्यांवर गाडी चढवली व मारले तो ‘गाडीवान’ मंत्री अजय टेनी यांचा मुलगा. या घटनेच्या चौकशीसाठी ‘एस.आय.टी.’ नेमली. त्यांनी आता अहवाल दिला, लखीमपूरची घटना म्हणजे ठरवून केलेले षड्यंत्र होते. वडिलांच्या मंत्रीपदाचा तोरा दाखवून त्याने शेतकऱ्यांना चिरडले. त्यासाठी विरोधकांनी मंत्र्यांचा राजीनामा मागितला तेव्हा सभागृहात पंतप्रधान, गृहमंत्री उत्तर द्यायला हजर नाहीत. प्रियंका गांधी यांनी लखीमपूर खेरीत त्या मध्यरात्री धाव घेतली नसती तर इतर सर्व प्रकरणांप्रमाणे हे प्रकरणही सरकारने दडपून टाकले असते; पण प्रियंका व राहुल गांधींनी ही लढाई शेवटपर्यंत नेलीच. अर्थात, सरकारच्या मुठीतील मीडियाने या विजयाचे पूर्ण श्रेय प्रियंका आणि राहुल गांधींना दिले नाही. राहुल गांधी यांचे म्हणणे असे की, ‘मोदी किंवा शहा हे फक्त मुखवटेच आहेत. देश आणि सत्ता नियंत्रित करणारे उद्योगपती आहेत. देशाचा मीडियाही त्याच शक्ती नियंत्रित करीत आहे.’ गांधी यांचे म्हणणे खरे मानले तरी या अज्ञात आणि अनियंत्रित शक्तींवर प्रहार करण्यासाठी काँग्रेस आणि विरोधी पक्ष काय करीत आहे?’, असा सावलही राऊत यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!