मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे रविवारी तातडीने दिल्लीला रवाना झाले होते. त्यांच्या या अचानक ठरलेल्या दौऱ्यामुले राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या असतानाच काल ( २१ जून ) रोजी पवारांनी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची भेट घेतली. पवार-किशोर यांची ही दुसरी भेट असून या दोघांमध्ये नेमकं कोणत्या विषयावर खलबतं झाली हे मात्र गुलदस्त्यातच आहे.
दरम्यान, या भेटीनंतर भाजप विरोधात सक्षम विरोधी आघाडी निर्माण करण्यासाठी शरद पवार यांनी हालचाली सुरु केल्या असून इतर राज्यातील भाजप विरोधी प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्याची रणनीती आखत असल्याच्या चर्चांना उधान आले आहे.
आता शरद पवार यांनी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी आज ( २२ जून ) ‘राष्ट्र मंच’च्या बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे. यात सहभागी होण्यासाठी काँग्रेस वगळून इतर विरोधी पक्षांना आमंत्रित करण्यात आलंय. यजमान म्हणून शरद पवार हेच या बैठकीचं नेतृत्व करणार असल्याचं समजलं जातंय.
मात्र, बैठकीपूर्वी ‘ही बैठक तिसऱ्या आघाडीसाठी नसल्याचं’ स्पष्टीकरण देण्यात आलंय. तर या बैठकीत राजकीय नेत्यांव्यतिरिक्त वेगवेगळ्या क्षेत्रातील इतर काही प्रसिद्ध व्यक्तींनाही आमंत्रित करण्यात आलंय. दुसरीकडे या बैठकीत कॉंग्रेसचा एकही नेता सहभागी होणार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे ‘राष्ट्र मंच’च्या छत्राखाली होत असलेली ही बैठक कॉंग्रेसला वगळून तिसऱ्या आघाडीची चाचपणी असल्याचे बोलले जात आहे.
तर शिवसेनाचे नेते देखील या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे प्रस्तावित तिसऱ्या आघाडीत शिवसेनेला नक्की काय स्थान आहे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खुलासा केला आहे.
आजच्या बैठकीत काही महत्त्वाचं होईल असं वाटत नाही. पवार मोठे नेते आहेत. विविध क्षेत्रातील अनेक लोक त्यांचा सल्ला घेण्यासाठी येत असतात. काल माझं पवारांशी फोनवर बोलणं झालं. आजची बैठक ही यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रमंचची आहे. त्यांचे काही मुद्दे आहेत. त्यावर चर्चा होणार आहे. देशातील विरोधी पक्षांची ही बैठक नाही. फार फार तर मजबूत विरोधी पक्ष स्थापन करण्याची ही पहिली पायरी आहे, असं म्हणता येईल, असं राऊत यांनी सांगितलं. काँग्रेस, शिवसेनेशिवाय देशात तिसरी आघाडी होऊ शकत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
महत्वाच्या बातम्या
- आज पवारांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक, कॉंग्रेसला सोडून तिसऱ्या आघाडीसाठी हालचाल ?
- रिक्षा चालक ते रिअल इस्टेट किंग…अविनाश भोसले यांचा थक्क करणारा प्रवास
- ‘मेरे दो अनमोल रतन’; प्राजक्ता माळी भाच्यांसोबत घालवते सुट्टीचा आंनद
- कोरोना संसर्गाच्या साथीत ऑलिम्पिक स्पर्धेत ‘कंडोम’ वाटपाचा अट्टहास
- अखेर अॅडम झाम्पा बोहल्यावर चढला; कोरोनामुळे रखडला होता विवाह

