मुंबई: उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान महाराष्ट्रातही थार जीप ज्याच्याकडे असेल त्याने रस्त्यावर यावं, बंद काय असतो दाखवतो; असा इशारा संजय राऊतांनी भाजपाला दिला आहे.
तर महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. बंद १०० टक्के यशस्वी झाला आहे. किरकोळ घटना घडल्या असतील तर बंद असताना जगभरात घडतात. शेतकरी न्यायाच्या प्रतिक्षेत असून शेतकऱ्यांना चिरडण्याच्या प्रवृत्तीविरोधात आमचा विरोध आहे. आज संपूर्ण देश महाराष्ट्राकडे पाहत आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्राच्या बंदकडे देशाचे लक्ष लागले आहे, बंदला पाठिंबा नाही असं विधान कोणी करत असेल तर त्यांनी आपण देशाचे नागरिक आहोत का, शेतकऱ्यांचे देणं लागतो का हा प्रश्न स्वत:ला विचारावा. बंद मोडून काढू, रस्त्यावर येऊन दाखवा असे आव्हान कोणी देऊ नये. केंद्रीय मंत्र्याच्या पुत्राने थार जीपगाडीने शेतकऱ्यांना चिरडलं, अशी कोणती गाडी मुंबईत, महाराष्ट्रात असेल तर त्याने रस्त्यावर आणावी, बंद चांगला आहे, तिन्ही पक्ष ताकदीने बंदमध्ये सहभागी झाले आहेत. असेही ते म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आधुनिक जनरल डायर योगी सरकारच्या निषेधार्थ एकत्र या’, यशोमती ठाकूर यांचे आवाहन
- ‘उद्धव ठाकरेंमध्येही अलीकडे राहुल गांधींची झलक दिसू लागली आहे’, भाजपचा टोला
- ‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान राज्यभरातील एसटी सेवा सुरू राहणार, महामंडळाचा निर्णय
- ‘शेतकऱ्यांनी वरुण गांधींचे अभिनंदन करायला हवे’, संजय राऊतांनी केले कौतूक
- ‘अन्नदात्यांचे ऋण फेडण्यासाठी बंदमध्ये सहभागी व्हा’, शिवसेनेचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

