Share

Mahesh Tapase | “बावनकुळेंनी अगोदर आपला मेंदू तपासावा, मगच…”; शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेला राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर

Published On: 

🕒 1 min read

Mahesh Tapase | मुंबई : भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल खळबळजनक वक्तव्य केलं आहे. शरद पवार भोंदूबाबा असून त्यांनीच उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला असल्याचं बावनकुळे म्हणालेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही यावर प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी यावर प्रत्युत्तर देत चंद्रशेखर बावामुळे यांच्यावर टीका केली आहे.

ते म्हणाले, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या मेंदूची आधी तपासणी करुन घ्यावी आणि मग बोलावे. तसेच, “जादूटोणा, भोंदूबाबा हे शब्द सभ्य संस्कृतीतील नाहीत. राजकारण करायचं असेल तर मुद्दयावर राजकारण करा.” असा इशाराही महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी दिला आहे.

पुढे ते म्हणाले, “महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा कुठल्या सरकारने आणला याचा विसर बावनकुळे यांना पडला असावा. शरद पवार (Sharad Pawar) यांची पकड महाराष्ट्रावर आहे. तुमच्यासारख्या जातीयवादी पक्षाच्या तावडीतून शिवसेनेला मुक्त करुन महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री यांना केले ही किमया पवारांची असल्याचं महेश तपासे म्हणाले. त्यामुळे २९ नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टाचा निकाल येईल, तेव्हा तुमचे सरकार पायउतार होणार हे निश्चित आहे. त्यानंतर तुम्हाला जादूटोणा जे काही करायचं ते करा, असेही महेश तपासे (Mahesh Tapase) म्हणालेत.

काय म्हणाले होते चंद्रशेखर बावनकुळे?

राष्ट्रवादीचा राज्यात बेईमानीतून सत्ता बनवण्याचा प्रयत्न होता. तो त्यांनी यशस्वी केला. म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यावर एकप्रकारे जादूटोणा करण्याचा हा प्रकार होता. तो त्यांनी केला, असं चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणालेत. त्या जादूटोण्यामुळे उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत गेले. शरद पवार हेच या जादूटोण्याचे भोंदूबाबा असल्याचं ते अप्रत्यक्षपणे म्हणाले. एकदा शरद पवारांच्या ताब्यात कोणी आला तर तो सुटत नाही, असा अशी बोचरी टीका त्यांनी केली होती.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!