🕒 1 min read
Sushma Andhare । मुंबई : पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणात यवतमाळचे आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) दोषी असल्याचा ठपका देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ठेवला होता. मात्र आता स्वतः चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनीच यातून यु टर्न घेतलेला दिसत आहे. यावरून आज एका पत्रकाराने प्रश्न विचारला असता चित्रा वाघ चांगल्याच भडकल्या. यावरून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी चित्रा वाघ यांना चांगलंच सुनावलं आहे.
त्या म्हणाल्या, भाजपमध्ये गेल्यावर सगळे विषय संपून जातात. आता संजय राठोड (Sanjay Rathod) हे देखील सत्तेत गेल्याने त्यांचा विषय़ संपणार असं वक्तव्य शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केलंय.
यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस हे द्वेषपूर्ण राजकारण करतायत, त्यांनी एकदा विचार केला पाहिजे, असा सल्ला सुषमा अंधारे यांनी दिलाय. देवेंद्र फडणवीसजी जेव्हा बोलतात तेव्हा आंदोलनं होतात. जेव्हा बोलतात तेव्हा आंदोलनं संपतात, असं त्या म्हणाल्या.
संजय राठोडला क्लीन चीट कुणी दिली? आमच्या भावनाताई मोदी साहेबांच्या बहीण झाल्या. तसं आता चित्राताई संजय राठोड यांच्या दीदी झाल्या पाहिजेत, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावलाय.
दरम्यान, शरद पवार हे जादूटोणा करतात,असे आरोप भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर केलेत. यावर सुषमा अंधारे म्हणाल्या, बावनकुळे यांनी आरसा पाहून वक्तव्य केलंय. देंवेंद्र फडणवीस हेच जादूटोणा करतात.
महत्वाच्या बातम्या :
- Skin Care Tips | चेहरा निस्तेज होत असेल, तर स्वयंपाक घरातील ‘या’ गोष्टी ठरतील उपयोगी
- Amol Mitkari | “सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील”; आव्हाडांच्या अटकेनंतर अमोल मिटकरींचा इशारा
- Explained | का झाली जितेंद्र आव्हाडांना अटक?, चित्रपटाला विरोध का? नेमका वाद जाणून घ्या!
- Winter Health Care | हिवाळ्यामध्ये शरीराला उबदार ठेवायचे असेल, तर ‘या’ गोष्टींचा आहारात करा समावेश
- Supriya Sule | जितेंद्र आव्हाड यांना अटक झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

