टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला देशाच्या प्रतिनिधित्वाची संधी दिली आहे. त्यामुळे देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नरेंद्र मोदी आपल्या बरोबर म्हणजेच मंत्रिमंडळात कोणाला घेणार असून शिवसेना या पारंपारिक मित्रपक्षाला मंत्रीमाडळात कितीपत स्थान मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
मोदींच्या या मंत्रीमाडळात शिवसेनेला दोन कॅबीनेट आणि एक राज्यमंत्री पदाची अपेक्षा आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यांनी शिवसेनेच्या नेत्यांची महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. येत्या ३० तारखेला पंतप्रधान मोदी आणि काही ठरावीक मंत्रीपदांचा शपथविधी होणार आहे.
तसे पाहता या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या अनुभवी नेत्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे त्यामुळे आता मोदींच्या मंत्रीमंडळात शिवसेनेकडून कोणाला संधी देयची हा गहन प्रश्न उद्धव ठाकरे यांच्या समोर उभा आहे. मात्र उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार गजानन कीर्तिकर हे सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले वयाने व अनुभवाने कीर्तिकर ज्येष्ठ आहेत. शिवसेनेतील असलेला त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. तसेच गेल्या लोकसभेतील प्रभावी कामगिरी पाहता त्यांची केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागण्याची शक्यता आहे.
तसेच शिवसेनेतर्फे कीर्तिकर, राज्यसभा खासदार संजय राऊत, बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, यवतमाळच्या खासदार भावना गवळी, राज्यसभा खासदार अनिल देसाई, सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत, दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांची नावे आघाडीवर आहेत. तर शिवसेनेतील आणि राजकारणातील दांडगा अनुभव असलेले संजय राऊत व कीर्तिकर यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

