Share

महाराष्ट्रात ‘कर्नाटक पॅटर्न’ राबवण्याचा डाव, संजय राऊतांचा भाजपवर आरोप 

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून शिवसेनचे खासदार संजय राउत यांनी भाजपला धारेवर धरलेले आहे. त्यांनी वारंवार मुख्यमंत्री शिवसेनेचाचं होणार अशी मागणी केली आहे. तसेच कधी पत्रकार परिषदेच्या तर कधी ट्वीटरच्या माध्यमातून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

संजय राउत यांनी आजही पत्रकार परिषद घेतली. आज त्यांनी राष्ट्रपती राजवट हा भाजपचा डाव आहे, पडद्यामागे कर्नाटक पॅटर्न राबवण्याचा डाव आहे. पण महाराष्ट्रात कुठलाही पॅटर्न चालणार नाही. महाराष्ट्र कुणालाही घाबरत नाही. ज्यांच्याकडे बहुमत आहे, त्यांनी सरकार बनवावं असंही त्यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना त्यांनी ‘दिल्लीसमोर ना शरद पवार झुकले, ना उद्धव ठाकरे झुकणार असं विधान केले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याविषयी भाष्य करताना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कारभार चालवावा, पण सूत्र हलवू नयेत. हा महाजनादेशाचा अपमान आहे. संविधानानुसार मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावाच लागणार असं विधान केले आहे.

दरम्यान, राज्यपाल उद्यापासून राज्याचा कारभार सांभाळतील, त्यामुळे आम्हाला त्यांनाच भेटावं लागेल, आणि ज्यांनी ही परिस्थिती निर्माण केली त्यांनाही महाराष्ट्राला उत्तर द्यावं लागेल असाही त्यांनी म्हटले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1192665605876244481?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1192657963996958720?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1192657220019687424?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!