Share

संजय राठोड यांनी आरोप धुडकावले, म्हणाले…

Published On: 

पोहरादेवी : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातआरोप झाल्यानंतर वनमंत्री संजय राठोड जनतेसमोर कधी येतात याची प्रतीक्षा सर्वांनाच लागली आहे. त्यांच्याशी संवाद व्हावा, त्यांच्यावर झालेल्या आरोपा संदर्भाने खुलासा व्हावा म्हणून माध्यमाचे प्रतिनिधी पोहरादेवी याठिकाणी डेरेदाखल आहेत. पोहरादेवी व संत सेवालाल महाराज यांचे दर्शन घेतल्यानंतर राज्य राठोड काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं होतं.

हजारोंच्या संख्येने राठोड समर्थक जमा झाले असून पोलिसांना जमावाला आवर घालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दोन आठवड्यांहून अधिक काळानंतर संजय राठोड हे माध्यमांसमोर आले असून त्यांची पत्रकार परिषद घेऊन गेल्या काही दिवसांपासून होणारे आरोप फेटाळून लावले आहेत.

‘पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूने बंजारा समाजाला दुःख झाले आहे. मी देखील चव्हाण कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जे काही राजकारण सुरु आहे ते अतिशय घाणेरडं आहे. माझ्यावर होणाऱ्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. मी ओबीसीचे नेतृत्व करणारा सामान्य कार्यकर्ता आहे. माझं आयुष्य उध्वस्त करण्याचा हा प्रयत्न आहे,’ असं देखील संजय राठोड म्हणाले आहेत.

मी गायब नव्हतोच – संजय राठोड

सुमारे दोन आठवड्यांपूर्वी पूजा चव्हाण हीने पुण्यात जीवन संपवले होते. यानंतर समोर आलेले फोटो, ऑडिओ क्लिप्स यांवरून वनमंत्री संजय राठोड यांचा देखील मृत्यूशी संबंध असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. याकाळात ते मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देखील गैरहजर राहिल्याचे दिसून आले. त्यामुळे ते गायब झाल्याची टीका करण्यात येत होती. यावर देखील त्यांनी खुलासा केला आहे. ‘गेल्या काही दिवसांपासून जी बदनामी सुरु आहे ती थांबवावी. मी १४ दिवस नाही तर फक्त दहा दिवस लांब होतो. माझ्या वृद्ध आईवडील, पत्नी व मुलांसमवेतच मी होतो. त्यांचा सांभाळ मी करत होतो, गायब झालो नव्हतो,’ असा खुलासा देखील संजय राठोड यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!