Share

‘मुंबई पालिका आणि पोलिसांना वेड लागलं वाटतं’; संजय निरुपम यांची घणाघाती टीका

Published On: 

मुंबई- सुशांतसिंह राजपूत प्रकरणात त्याची मैत्रीण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी बिहार पोलिसांनी पाटणा शहर एसपी विनय तिवारी यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यांची टीम मुंबईला पाठवली आहे.

सुशांतच्या बॅंक खात्यातून 15 कोटी रुपयांची रक्कम परस्पर वळती केल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबाने रियावर केला आहे.सुशांतच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून पाटणा येथील राजीव नगर पोलीस ठाण्यात अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी आता बिहार पोलीस देखील मुंबईत दाखल झाले आहेत.याप्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी मुंबईत आलेले आयपीएस अधिकारी  बिनय तिवारी यांना मुंबई महानगरपालिकेने क्वारंटाईन केलं आहे. बिहार पोलिसांनी तिवारी यांना जबरदस्तीने क्वारंटाईन केल्याचा आरोप केला आहे.

यावरून काँग्रेस नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी मुंबई पोलीस आणि पालिकेला चांगलंच सुनावलं आहे.पालिका आणि पोलिसांना वेड लागलं वाटतं असं म्हणत संजय निरुपम यांनी हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी सोमवारी (3 ऑगस्ट) एक ट्विट केलं आहे.

मुंबई पालिका आणि पोलिसांना वेड लागलं वाटतं. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आलेले बिहारचे पोलीस अधिकारी विनय तिवारी यांना 15 ऑगस्टपर्यंत क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. चौकशी कशी होणार?, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करावा. तिवारी यांची सुटका करून त्यांना तपास कामात मदत करावी. नाही तर मुंबई पोलिसांवरील संशय आणखी वाढेल असं ट्विट निरुपम यांनी केलं आहे.

दुसरीकडे, रिया चक्रवर्ती हिचा पत्ता पोलिसांना लागत नाहीये. रियाच्या घरी चौकशीसाठी गेलेल्या टीमला ती सापडली नाही. एका बड्या बॉलिवूड अभिनेत्याच्या घरी ती लपून बसल्याचा दावा केला जात आहे. मात्र रिया पाताळात गेली, तरी आम्ही तिला शोधून काढू, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचे निधन!

संयम ठेवून आहोत…नाही तर शिवसेना स्टाईलने चोप देऊ; शिवसेना नगरसेवकाने दिला मनसेला ईशारा

राज्यात आज पुन्हा एकदा नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक…

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!