टीम महाराष्ट्र देशा – विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. अशाच एक प्रचारसभेत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भविष्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचे संकेत दिले आहेत. याचा धागा पकडत भाजपचे खासदार संजय काकडे यांनी यावर भाष्य केले आहे.
संजय काकडे यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या २० जागा आणि राष्ट्रवादीच्या २० जागा येतील. दोन्ही पक्षाच्या मिळून ४० जागा आल्या तर शरद पवारांना राज्यसभेवर पाठवायचं असेल, तर दोन्ही पक्षांना विलिनीकरणाशिवाय कोणताही पर्याय नसेल असं विधान केले आहे. त्यामुळे आघाडीचे नेते काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकाच आईची लेकरं आहोत आणि एकाच आईच्या मांडीवर आम्ही दोन्ही पक्ष खेळलो आहे. त्यामुळे भविष्यात आम्ही एकत्र येऊ असं ते म्हणाले होते. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी एक होणार अशी अफवा पसरली होती. परंतु यातून काहीच तथ्य समोर आले नव्हते. त्यामुळे आता शिंदे यांच्या विधानाने खरच एकत्र येतील की हीसुद्धा अफवाचं ठरेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, शरद पवार हे यापूर्वी कॉंग्रेसमध्येचं होते. १९९९ ला त्यांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केली होती. त्यानंतर कॉंग्रेससोबत आघाडी करत केंद्रात आणि राज्यात सत्तेत सहभागी झाले होते. त्यामुळे राष्ट्रवादी ही कॉंग्रेसमध्ये विलीन होऊ शकते.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1181781304339120128?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181772239508656130?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

