बुलढाणा : संजय राऊत यांच्या घरी ईडीची कारवाई मी टीव्हीच्या माध्यमातून बघितलं. पण गेल्या पंधरा दिवस महिन्याभरापासून त्यांना इडी ऑफिसमध्ये चौकशी करता बोलावले जात आहे. पण ते टाळाटाळ करत आहेच. शेवटी ईडी एक देशाची व्यवस्था आहे. कधी शासकीय डिपार्टमेंट जर तुम्हाला कुठल्या चौकशीला बोलवत असेल तर आपण तिथं न जाता त्याचा अवमान करत आहात किंवा तुम्ही त्याला चॅलेंज करत आहात, असे शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड म्हणाले.
संजय राऊत निर्दोष असतील तर कोर्ट त्यांना निर्दोष सोडेल. त्यांना घाबरून जायची काय गरज आहे. ऐरवी बेलगामपणे बोलतात. छाती नसताना छाती काढून आव आणायचा प्रयत्न करतात. मग आता ही जा म्हणा ईडीला सामोरे. जे काही सत्य असेल ते बाहेर येईल. अशी आमदार संजय गायकवाड यांनी खासदार संजय राऊत यांच्या ईडी चौकशीवर दिली.
महत्वाच्या बातम्या :
- मोठी बातमी! पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत ईडीच्या ताब्यात
- Uday Samant | संजय राऊतांच्या चौकशीनंतर दूध का दूध पाणी का पाणी होईल – उदय सामंत
- Nilesh Rane on Sanjay Raut | संजय राऊतांची पुढची मुलाखत जेलमध्ये जेलरसोबत ; निलेश राणेंचा टोला
- Yashomati Thakur | शिंदे गटात गेलेल्यांना वॉशिंग पावडरमध्ये स्वच्छ केले का? – यशोमती ठाकूर
- Sanjay Raut ED Inquiry | संजय राऊतांच्या अटकेवर एकनाथ शिंदे यांचे मोठे वक्तव्य! म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

