बुलढाणा : विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. सत्ताधारी विधानसभेच्या परीसरात येताच विरोधकांनी पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. “आले रे आले गद्दार आले”, “50 खोके एकदम ओके!”, “रोख घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो!” अश्या घोषणा विरोधकांनी लगावल्या. यावेळी धनंजय मुंडे चांगलेच जोशात होते. त्यावरूनच शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी नारेबाजी करणाऱ्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. सत्ता गेल्याने त्यांच्यावर ही वेळ आली असल्याची टीका सुद्धा गायकवाड यांनी केली.
“राष्ट्रवादीच्या आमदारांना आम्हाला गद्दार म्हणण्याचा अधिकार नाही. यापूर्वी अजित पवारांनी आपल्या काकासोबत गद्दारी करून शपथ घेतली होती. त्यावेळी त्यांनी नारेबाजी का केली नाही?”, असा सवाल संजय गायकवाड यांनी केला. तर गायकवाड यांनी धनंजय मुंडे यांचाही चांगलाच समाचार घेतला. गायकवाड म्हणाले की, “धनंजय मुंडेंची सगळी लफडी महाराष्ट्रातील टीव्हीवर बाहेर आली, जे एक लोकप्रतिनिधी म्हणजेच मंत्री आहेत आणि त्यांचीच लफडी समोर आली. ते राज्यभर लफ़डी करत फिरतात त्यांनी आम्हाला गद्दार म्हणण्याचा काय अधिकार आहे?… आम्ही गद्दार नसून खुद्दार आहोत. शिवसेना हि आमची आहे. आम्ही काही पक्ष सोडलेला नाही. त्यामुळे आम्हाला बोलण्याचा अधिकार राष्ट्रवादीवाल्यांना नाही.”, अशी जहरी टीका गायकवाड यांनी केली.
व्हिप हा शिवसेनेचा म्हणजे आमचाच
हे सरकार घटनेच्या विरोधात काम करत आहेत. जर आपण कायद्यात बघितले तर व्हिप हा शिवसेनेचा म्हणजे आमचाच आहे. हे जे ४० गद्दार आहेत. यांचा ना व्हिप आहे, ना तिथे बसण्याचा नैतिक अधिकार आहे. पक्षाची कारवाई चालू राहते, असे आदित्य ठाकरे म्हणाले. वरळी मतदार संघात भाजप दहीहंडी साजरी करणार आहे, यावर आदित्य ठाकरे म्हणाले. चांगली गोष्ट आहे. वरळी सर्वांना आवडायला लागली आहे. प्रत्येकाने तिथे उत्सव साजरे करावे, आम्ही कुठेही चॅलेंज करणार नाही. आम्ही पोरकटपणा करणार नाही. सगळ्यांनी सण साजरा करवा, आणि राजकारण आणू नये ही आमची भावना आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Devendra Fadanvis | देवेंद्र फडणवीसांचा केंद्रीय निवडणूक समितीत समावेश, नितीन गडकरींना हटवले
- Supriya Sule । मोहित कंबोज यांच्या ट्विटची अमित शाह यांनी चौकशी करावी; सुप्रिया सुळेंची मागणी
- Manisha Kayande | एकनाथ शिंदे यांची स्वप्ने मुंगेरीलालची स्वप्ने बनतील – मनीषा कायंदे
- Anil Bonde | “पापं केलेल्यांची धुग धुग वाढली असेल”; कंबोज यांच्या ट्विटवर बोंडे यांची प्रतिक्रिया
- Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे अजूनही विधान परिषदेवर! आमदारकीचा राजीनामा दिलाच नाही, काय आहे कारण ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

