Share

‘संज्या अशा वेळेला आंधळा बहिरा होतो’, निलेश राणेंचा घणाघात

Published On: 

मुंबई : त्रिपुरा यथील कथित दंगलीनंतर अमरावती शहरात हिंसाचार उसळला होता. यात मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज आमरावती दौऱ्यावर आले आहेत. ते पोलीस अधिकाऱ्यांसह पीडित व्यापाऱ्यांच्याही भेटी घेणार आहे. यावर भाजपनेते निलेश राणे यांनी आघाडी सरकारवर जहरी टीका केली आहे.

निलेश राणे ट्विट करत म्हणाले, फडणवीस साहेब दंगली झाल्या तिथे दौऱ्यावर आहेत, स्थानिकांची व्यथा जाणून घेतायत, स्वतः पायी चालून तोडफोड झाली तिथे पाहणी करत आहेत पण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तिथे फिरकले सुद्धा नाहीत त्याहून वाईट ज्यांनी तोडफोड केली ते उघड फिरत आहेत. संज्या अशा वेळेला आंधळा बहिरा होतो. अशी जहरी टीका निलेश राणेंनी आघाडी सरकारवर केली आहे.

१२ व १३ नोव्हेंबर रोजी अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला होता. यात अनेक व्यवसायिकांच्या दुकानांची तोडफोड झाली होती. या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर आता अमरावती शहरातील वातावरण पूर्वपदावर येत आहे. याचा आढावा घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस आज अमरावती शहरात दाखल झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!