Share

संग्राम जगताप यांचा भाजपला धक्का; स्थायी समिती सभापती पदाचा भाजपचा उमेदवारच राष्ट्रवादीत

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपकडून तयारी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या साथीने सभापती पद मिळवण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केले होते.

स्थायी समितीच्या सभापती पदासाठी भाजपातील अनेक इच्छुकांनी तयारी सुरू केली होती. यात मनोज कोतकर यांचे नाव भाजपकडून अंतिम असल्याचे सांगण्यात येत होतं. परंतु आता भाजपचे मनोज कोतकर यांनी राष्ट्रवादीत काँग्रेस पार्टीत प्रवेश केला आहे.

महापालिका स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर वेगवान हालचाली होत भाजपकडून सभापती पदासाठी इच्छूक असलेले पण राष्ट्रवादीचे काँग्रेस पार्टीचे आमदार संग्राम जगताप यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. स्थायी समितीच्या सभापती निवडणुकीच्या अगोदरच आ.संग्राम जगताप यांनी भाजपला जोरदार झटका दिला आहे.

मनोज कोतकर यांनी पक्ष प्रवेशानंतर लगेच सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता शिवसेना कोतकर यांच्या विरोधात फॉर्म दाखल करणार का? भाजपही नेमकी काय भूमिका घेणार? या प्रश्‍नांची उत्तरे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतरच मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!