मुंबई : कोरोनाच्या लढ्यात आता सांगलीकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. शहरातील कोरोना बाधित मृत व्यक्तीच्या संपर्कातील 15 जणांचे अहवाल सुद्धा निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.
तसेच सांगली येथील कोरोना बाधीत झालेल्या व काल रविवारी मृत्यू पावलेल्या रूग्णाशी संबंधित एकूण 16 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. यामध्ये सदर रूग्णाच्या कुटुंबातील 5 व्यक्तींचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत.
दरम्यान, इस्लामपूरमधील त्या 26 व्या महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात 26 रूग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना बाधित आणि मयत सदर व्यक्तीशी संबंधित संपर्क बाधित अन्य 11 जण इन्स्टिट्युशनल क्वॉरंटाईनमध्ये असलेल्या व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अद्याप आणखी 15 जणांचे रिपोर्ट येणे बाकी असून त्याचे जर रिपोर्ट निगेटिव्ह आले तर सांगली कोरोनाविरोधातील लढा अखेर जिंकतील.
काल राज्यात कोरोनाबाधीत ४६६ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ४६६६ झाली आहे. ६५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ५७२ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ३८६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

