पुणे : माजी आमदार रामभाऊ मोझे यांच्या कुटुंबियांच्या घरातून 100 तोळे दागिन्यांसह रोख 4 लाख रुपयांची चोरी झाली आहे. पुण्यातील संगमवाडी गावात माजी आमदार रामभाऊ मोझे यांचे पुतणे हरिश्चंद्र मनोहर मोझे आणि मोहन मनोहर मोझे यांच्या घरात चोरी झाली आहे.
तिन चोरट्यांनी तब्बल 100 तोळे सोने आणि रोख चार लाख रुपये चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.या घटनेमुळे संगमवाडी परिसरात एकच खळबळ उडालीय. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक समीर करपे तपास करीत आहेत.
हरिश्चंद्र मनोहर मोझे आणि मोहन मनोहर मोझे या दोघांचे कुटुंब बाहेर गावी फिरण्यास गेले होते. तरी आल्यावर घरातील वस्तु इतरत्र पडलेल्या दिसल्या. कपाटातील दागिने, पैसे जागेवर नव्हते. घरात चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. तीन चोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून येरवडा पोलीस तपास करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मनी हाईस्ट’मधील ‘या’ भूमिकेत पंकज त्रिपाठीला पाहून चाहते भडकले
- ‘गरीबांची मुले शिकली, मोठी झाली, उच्च विद्या विभूषित झाली तरच त्यांचे जीवनमान उंचावेल’
- बिंदूसरासह माजलगाव धरण शंभर टक्के भरले, ११ दरवाजे उघडले
- अजिंक्य रहाणे शून्यावर बाद; नेटकरी म्हणाले, ‘जारवोप्रमाणे रहाणेला ओढून बाहेर काढा’
- खेड : तरसाचा दोघांवर हल्ला, तरुणाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे वृद्धाचा जीव वाचला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

