Share

#coronavirus : ‘ग्रामीण भागातील विकास कामांना चालना द्या’

Published On: 

मुंबई : अनेक घटकांना लॉकडाऊनचा सामना करावा लागत आहे. तसेच सरकारकडून सर्वोत्तोपरी मेहनत घेतली जात आहे. देशभरातील सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर, पोलीस रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.

याच पार्श्वभूमीवर केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्रजी तोमर यांनी विविध राज्यातील कॅबिनेट मंत्र्यांसोबत लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागातील विकासकामांबद्दल व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. या चर्चेत महाराष्ट्र सरकार तर्फे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी तोमर यांच्यासोबत संवाद साधला.

यावेळी बोलताना भुमरे म्हणाले, ‘रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकासकामांना मोठ्या प्रमाणावर चालना देऊन लॉकडाऊनच्या काळात अकुशल मजुरांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध करून द्या, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, भुमरे यांनी धोरणात्मक व नियोजनबद्ध काम करून ग्रामीण विकास साधण्यासाठी उपाययोजना सुचवल्या आहेत. या सूचनांचा तात्काळ विचार करून संबंधित सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकार तात्काळ पाऊले उचलतील, असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री तोमर म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!