Share

Sandipan Bhumre | “शिंदेंचे मोठे स्वागत नागरिकांनी केले त्यामुळे…” ; दानवेंच्या आरोपावर संदिपान भूमरेंचे स्पष्टीकरण

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : शिंदे गटातील आमदार संदिपान भूमरे यांच्यावर विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आरोप केले होते. भूमरे यांच्या मतदार संघातील महत्त्वाकांक्षी ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेचं कंत्राट त्यांच्या जावयाला मिळाल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला होता. यासाठी भूमरे यांच्या जावयाने रजिस्ट्री करून घेतली, असे देखील दानवे म्हणाले होते. यावर एका वृत्तवाहीणीशी बोलताना भुमरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

संदिपान भूमरे म्हणाले, “अंबादास दानवे यांनी केलेले आरोप खोटे आहेत. याबाबत अजून टेंडर देखील निघाले नाही. जावई असले म्हणून काय झालं. त्यांचे ते जुने रजिस्ट्रेशन आहे. जावई होण्याच्या आधीपासून ते कॉन्ट्रक्टरशीप करतात. त्यामुळे यात काही माझा सबंध नाही. टेंडर हे ऑनलाईन असते, त्यामुळे मी टेंडर द्यायचा प्रश्न नाही, माझ्या हातात तसे कोणतेही अधिकार नाहीत. अंबादास दानवेंचा आरोप साफ खोटा आहे. एकनाथ शिंदेंचे मोठे स्वागत नागरिकांनी पैठणला केले त्यामुळे भुमरेशिवाय त्यांना कोणी दिसत नाही. ब्रह्मगव्हाणचं काम निधीअभावी दोन वर्षांपासून बंद आहे. निधीसाठी मी उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे लागलो होतो की शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवा. आता निधी मंजूर झालाय. टेंडर कुणीही भरू शकतं. ते ऑनलाइन टेंडर आहे.”

खैरेंच डोकं गौमुत्राने साफ करावे लागणार-

पैठणच्या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बिडकीनवरुन निघाल्यानंतर तिथे गौमुत्र शिंपडण्यात आले. यावर संदिपान भूमरे म्हणाले, “गौमुत्र शिंपडण्याचे काम, हे सांगायचं काम चंद्रकांत खैरेंचे आहे. पण गौमुत्राने रोड साफ करण्यापेक्षा खैरेंच डोकं गौमुत्राने साफ करावे लागणार आहे. आता त्यांना त्याची गरज आहे. कारण त्याचे डोकं आता काम करत नाही. त्यामुळे त्यांचे डोके गौमुत्राने धुवावे लागणार आहे आणि ते आम्ही धूवू, त्याच्याशिवाय ते साफ होणार आणि खरैंचं डोकं काम करणार नाही.”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!