Keeway च्या या नवीन लाँच झालेल्या दोन्ही बाईक मध्ये 4-पिस्टन कॅलिपरसह ड्युअल-चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, समोर 292mm डिस्क ब्रेक आणि सिंगल-पिस्टन कॅलिपरसह मागील बाजूस 220mm डिस्क ब्रेक आहेत.
दुचाकी उत्पादक कंपनी Keeway ने अलीकडेच देशात नवीन बाईक V302C अर्बन क्रूझर लाँच केली आहे. आता कंपनीने आपल्या दोन नवीन बाईक्स Keeway 300 N Naked आणि K300 R Fully Faired भारतात लॉन्च केल्या आहेत. या दोन्ही बाईक 300cc सेगमेंटमधील स्पोर्ट्स बाईक्स आहेत. ज्यामध्ये Keeway K300 N ची एक्स-शोरूम किंमत 2.65 लाख ते 2.85 लाख रुपये आणि Keeway K300 R ची एक्स-शोरूम किंमत 2.99 लाख ते 3.20 लाख रुपये आहे. Keeway K300 N अतिशय आक्रमक आणि स्टायलिश लुकसह येतो. तर K300 R ही पूर्णतः फेअर बाईक आहे.
इंजिन
दोन्ही नवीन बाईक्समध्ये 292.4cc लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन वापरण्यात आले आहे. हे इंजिन 8,750 rpm वर 27.5 bhp चा पॉवर आउटपुट आणि 7,000 rpm वर जास्तीत जास्त 25 Nm टॉर्क निर्माण करते. या इंजिनला 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे ज्यामध्ये स्लिपर क्लच उपलब्ध आहे. या दोन्ही बाइक्समध्ये इंधनासाठी 12-लिटर टाकी आहे. स्टील ट्रेलीस फ्रेमवर बांधलेल्या, या बाइक्सना मागील बाजूस मोनोशॉक आणि पुढील बाजूस 37mm USD फ्रंट फोर्क्स मिळतात.
Keeway च्या या बाईक्स कशा दिसतात
या दोन्ही नवीन बाईक काळ्या, पांढर्या आणि लाल रंगाच्या पर्यायांमध्ये लॉन्च केल्या गेल्या आहेत, तसेच दोन्हीमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, अंडरस्लंग एक्झॉस्ट आणि ऑल-एलईडी लाइटिंग सिस्टम आहे. K300 N ची रचना बाजारात उपलब्ध असलेल्या CF Moto 300NK सारखीच आहे. K300 R दिसायला अगदी जागतिक बाजारात आधीच विकल्या गेलेल्या CF Motor 300SR सारखा दिसते.
डाइमेंशन
या दोन्ही बाईक्समध्ये 4-पिस्टन कॅलिपरसह ड्युअल-चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, समोर 292mm डिस्क ब्रेक आणि सिंगल-पिस्टन कॅलिपरसह मागील बाजूस 220mm डिस्क ब्रेक आहेत. दोन्ही बाईकच्या पुढील बाजूस 110/70 सेक्शन आणि मागील बाजूस 140/60 सेक्शन टायरसह 17-इंच अलॉय व्हील आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Narayan Rane | “कसला आदित्य ठाकरे, काय कळतं त्याला” ; नारायण राणे का संतापले?
- Aditya Thackeray । “उद्योगमंत्री कोण आहेत?, गद्दार!”, आदित्य ठाकरे आणि शिवसैनिकांमध्ये जुगलबंदी
- ‘ही’ भारतीय व्यक्ति बनणार आहेत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती.. जाणून घ्या!
- Narayan Rane | “उद्धव ठाकरेंच्या पापामुळे वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये गेला” ; नारायण राणेंचा घणाघात
- Aditya Thackeray । सुरक्षेत हलगर्जीपणा? आदित्य ठाकरे म्हणाले, “जर काही घडलं तर…”
- Shivsena । आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत हलगर्जीपणा? गृहविभागाकडून सुरक्षारक्षकांना वाहनेच दिली नसल्याचा आरोप
- Oppo F21s Pro Series | Oppo ने लॉन्च केले 2 नवीन स्मार्टफोन, जाणून घ्या दोन्हीची सर्व वैशिष्ट्ये आणि किंमत..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

