Share

जयदत्त अण्णांचा पुतण्याला जबर दणका, संदीप क्षीरसागर यांच्या कट्टर समर्थकाला लावले गळाला

Published On: 

बीड : महाराष्ट्राला काका-पुतण्याचा संघर्ष काही नवा नाही. ठाकरे, मुंडे ते बीडचे क्षीरसागर यांच्यातील वाद नेहमीच सुरु असतो. बीड मध्ये माजी मंत्री आणि शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यात नेहमीच टोकाचा संघर्ष पाहायला मिळत असून बीडमध्ये या काका पुतण्याचे शह-कटशहाचे सुरु असते.

आता राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे समर्थक, नगरसेवक बाळासाहेब गुंजाळ यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर, शिवसेनाप्रमुख कुंडलिक खांडे आदींच्या उपस्थित गुंजाळ यांनी हातात शिवबंधन बांधले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे ते कट्टर समर्थक होते. त्यामुळे हा काकांनी पुतण्याला दिलेला जबर दणका असल्याचे बोलले जात आहे.

पेठ बीड भागातील सिंहासनाधिश ग्रुपच्या माध्यमातून युवकांचे मोठे संघटन निर्माण करणाऱ्या बाळासाहेब गुंजाळ यांनी नगरसेवकपद भूषविले. गुंजाळ यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, संपर्क प्रमुख आनंद जाधव, माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसला अखेरचा रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला. बाळासाहेब गुंजाळ यांच्या प्रवेशाने पेठ बीड भागात पुन्हा एकदा शिवसेनेचे भगवे वादळ निर्माण होणार आहे, असं शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!