Share

रुग्णालयातून घरी परतल्यांनंतर रजनीकांत यांनी घेतला मोठा निर्णय

Published On: 

मुंबई : तामिळनाडूमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर तेथील राजकारणात निवडणुकीसंबंधी हालचाल वाढू लागल्याचं दिसलं  दरम्यान यावेळी अभिनेता रजनीकांत निवडणूक लढवणार का ? अशी चर्चा चांगलीच रंगली होती.

नवीन वर्षाबरोबर अखेर त्यांनी आपणही राजकारण जगात पाऊल टाकणार असल्याचं म्हटलं होतं. 31 डिसेंबर रोजी ते यासंदर्भात मोठी घोषणा करणार होते. मात्र, आता रजनीकांत यांनी राजकारणाच्या जगात प्रवेश न करण्याचा निर्णय घेतला आहे.

तरीदेखील लोकांसाठी काम करत राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रजनीकांत यांनी स्वत: याविषयी माहिती दिली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, रजनीकांत हे कोणताही राजकीय पक्ष सुरू करणार नाहीत.

दरम्यान, अभिनेता रजनीकांत यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना तीव्र रक्तदाब असल्याचे आढळून आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. हैदराबादमधील अपोलो हॉस्पिटल मध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. आता रजनीकांत यांची प्रकृती सुधारली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!