🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : पंढरपुरात विठ्ठलाची महापूजा सुरु असतानाच इकडे मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी विठ्ठलाची सपत्नीक पूजा केली. मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन काही आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात येण्यास विरोध केला होता. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात जाण्याचं टाळलं आहे.
दरम्यान, विठ्ठलाच्या कृपेनंच आपण हेलिकॉप्टर अपघातातून बचावल्याचं ट्विटही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळेस केलं आहे.
25 मे 2017:
काही गावांच्या भेटी आटोपून परतीच्या प्रवासाला निघालो, तेव्हा हेलिकॉप्टरचा अपघात झाला. सारे काही तुटले. पण, सुखरूप वाचलो अन् सुखरूप राहिली ती ही मूर्ती! मी अंधश्रद्धा मानत नाही. पण, हा तर माऊलीचाच आशिर्वाद होता. तेव्हापासूनच ती मूर्ती माझ्या देवघरात रोजच्या पूजेत आहे. pic.twitter.com/287YS54Au4— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 22, 2018
तर आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या आंदोलकांनी गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा परिसरात ठिय्या दिला आहे. तसंच मुख्यमंत्र्यांना शासकीय पूजा करु न देण्याचा निर्णय मराठा मोर्चेकऱ्यांनी घेतला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीही शासकीय पूजा न करण्याचा निर्णय घेतला होता.
‘मराठा समाजाच्या बहुतांश मागण्या पूर्ण,महापूजेला विरोध करणे उचित ठरणार नाही’ – चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
