पुणे – कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळता देशभरात इतर सर्व दुकाने बंद आहेत. लॉक डाऊनमुळे इतर सर्व दुकाने बंद असल्याने हातावर पोट असणाऱ्या आणि गोर- गरीब लोकांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा लोकांना विविध स्तरातून मदतीचा हात दिला जात असतानाच कुडजे गावातील गोर गरीब आणि गरजू लोकांसाठी माजी सरपंच समीर रवींद्र पायगुडे धावून आले. पायगुडे यांनी ३५० हून अधिक गरजू आणि गोर गरीब लोकांना किराणा सामान व जीवनश्याक वस्तू तसेच अन्नधान्य पुरवून लॉकडाऊनच्या काळात मोठा दिलासा दिला आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस साजरा न करता गावातील गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू पुरवून माजी सरपंच समीर रवींद्र पायगुडे यांनी सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श घालून दिला आहे. तसेच कोरोनाच्या महामारीत नागरिकांची उत्तम काळजी घेणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले.
कोरोना संकटात राज्यभरात ३२ लाखांहून अधिक नागरिकांना काँग्रेसकडून थेट मदत
उत्तमनगर पोलिस ठाण्याचे पो. नि. सुनील पंधरकर, पोलिस उपनिरीक्षक ढेगले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत किराणा सामान व जीवनश्याक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी माजी सरपंच सुरेश आण्णा गुजर, सरपंच अश्विनी पायगुडे, ज्ञानेश्वर पायगुडे, उपसरपंच सीमा पायगुडे यांचे सहकार्य लाभले.
पालघर प्रकरण : आरोपींची नावे उघड केल्या प्रकरणी भाजपच्या सरपंचाला धमकी


