Share

पालघर प्रकरण : आरोपींची नावे उघड केल्या प्रकरणी भाजपच्या सरपंचाला धमकी

Published On: 

पालघर : पालघरच्या डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर आल्याच्या संशयाने ग्रामस्थांच्या जमावाने तिघांची हत्या केल्याची घटना १६ मार्च रोजी घडली. या प्र्क्नामुळे राज्यातलं राजकारण तापलं असतानाच या प्रकरणाला एक वेगळच वळण लागलं आहे.

या प्रकरणातील सर्व आरोपींची नावे सरपंचांनी पोलिसांना दिल्याचा आरोप सरपंच चौधरी वर केला जात असून गावातील काही महिला आणि पुरुषांनी माझ्या घरात येऊन अटक केलेल्या सर्वाना सोडवं अन्यथा तुझे घरदार तोडून-फोडून तुझ्या मुलासह सर्वाना ठार मारू अशी धमकी दिल्याचे सरपंचांनी सांगितले.

याबाबत चे वृत्त लोकमत ने दिलं आहे. ‘माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्याने मला पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी सरपंचांनी पोलिसांकडे केली असताना पोलिसांकडून अजूनही आपल्याला संरक्षण दिले गेले नसल्याचे सरपंचांनी यावेळी बोलताना सांगितले.

दरम्यान, डहाणू तालुक्यात असलेल्या गड चिंचले मध्ये साधू आणि त्या चालकाची कार वन विभागाने अडविल्या नंतर हळूहळू जमाव जमू लागला आपल्या मुलांच्या किडण्या काढण्यासाठी आल्याच्या संशयाने त्यांना जमावाने ताब्यात घेतले. सरपंच म्हणून त्यांना बोलाविण्यात आले असता कायदा हातात घेऊ नका पोलिसांना येऊ द्या असे त्यांनी सांगितल्या नंतर लोक माझ्यावर भडकले,’ असं सरपंचांनी सांगितले.

याच प्रकरणाबाबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर गंभीर आरोप केला होता. ‘मॉब लिंचिंगचे केंद्र असलेल्या यूपीच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना फोन करणं हा शहाजोगपणा आहे. खरंतर गडचिंचले ग्रुप ग्रामपंचायत हा भाजपचा बालेकिल्ला असून तिथं गेली दहा वर्षे भाजपचा सरंपच आहे. सध्या भाजपच्या चित्रा चौधरी या सरपंच आहेत. लिंचिंगच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांमध्ये बहुसंख्य भाजपचे लोक आहेत, असं सावंत यांनी म्हटलं होतं.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!