Share

‘उद्धव ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्री, तर वाझे टॉलस्टॉय आणि राहुल गांधी हे आजचे तेनाली रामन’

Published On: 

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कमाल केली आहे. पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरेंनी लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत नाव पटकावलं आहे. प्रश्नम या संस्थेने महाराष्ट्र, बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या 13 राज्यांतील जनतेचा कौल जाणून घेतला होता. या सर्वेक्षणात सर्वाधिक मतदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पसंती दर्शवली आहे.

दरम्यान, यानंतर मुख्यमंत्र्यांचे कौतुक काहीजण करत आहेत तर काहीजण आता मुख्यमंत्र्यांवर टीका करू लागले आहेत. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. ‘उद्धव ठाकरे हे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री असतील तर वाझे हे टॉलस्टॉय आणि राहुल गांधी हे आजच्या युगातील तेनाली रामन असावेत,’ असं म्हणत अतुल भातखळकर यांनी खिल्ली उडवली आहे.

तर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी देखील उपरोधिक शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आज. ‘पुण्यात अशी म्हणायची पद्धत आहे लक्ष्मी रोडची मिसळ जगात भारी पुण्याची मस्तानी जगात भारी चितळेंची बाकरवडी जगात भारी तसाच तो सर्वे वाटतोय आमचा मुख्यमंत्री जगात भारी.’ असा टोला देशपांडे यांनी ट्वीट करून लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!