Share

परिस्थिती अराजकताकडे जाण्याआधी लवकरात लवकर तोडगा काढा – संभाजीराजे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या गोंधळाची परिस्थिती आहे. सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि शिवसेनेत मतभेद आहेत. त्यामुळे संपूर्ण देशात महाराष्ट्राची चर्चा आहे. सत्ता स्थापनेवर तोडगा काढण्यासाठी दोनही पक्षांचे नेते प्रयत्न करत असताना दिसत आहेत.

राज्यातील या परिस्थितीवर छत्रपती संभाजीराजे यांनी भाष्य केले आहे. त्यांनी पुरोगामी महाराष्ट्राची चर्चा आज देशभर सुरू आहे. ती काही चांगल्या कारणासाठी नाही. परिस्थिती आराजकता कडे जाण्याआधी, लवकरात लवकर तोडगा काढण्याची आवश्यकता आहे असं विधान केले आहे.

पुढे बोलताना संभाजीराजेंनी ‘राजकारण हे शुद्ध समाजोन्नतीसाठी, राष्त्रोन्नतीसाठी असावे. जर आपण तसे करत नसू, तर मग छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि शाहू फुले आंबेडकरांचे नाव घेऊन राजकारण करण्याचा अधिकार आपल्याला आहे का? यावर चिंतनाची आवश्यकता आहे असाही मत व्यक्त केले आहे.

दरम्यान, भाजपने या विषयी तोडगा काढण्यासाठी मंगळवारी बैठक बोलावली होती. यानंतर भाजप नेत्यांनी अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेकडून याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्वाचे आहे.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1191949199501340672?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1191940746548588546?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1191934557068709889?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!