🕒 1 min read
मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षांसह संचालक मंडळ बरखास्त करण्याचा मोठा निर्णय उद्धव ठाकरेंच्या सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मंडळाच्या सर्व नेमणुका रद्द करण्यात आल्या आहेत. मराठा समाजाला हा एक प्रकारे मोठा धक्का असल्याचं समजलं जात आहे.
अध्यक्ष नरेंद्र पाटील गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर टीका करत होते. त्यामुळेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षांसह संचालक मंडळ बरखास्त निर्णय घेण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील एक लाख मराठा तरुणांना उद्योग, रोजगार तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे उद्दिष्ट असल्याचं नरेंद्र पाटील यांनी सांगितलं होतं. आतापर्यंत 11 हजार मराठा तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून साडेपाचशे कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले असल्याची माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला नागपुरात बोलावून अधिवेशनादरम्यान महामंडळाचा आढावा घेतल्याचं नरेंद्र पाटील यांनी सांगितलं होतं. महामंडळ अजून गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा जबाबदारी सांभाळण्यास सांगितले असल्याचंही पाटील यांनी म्हटलं होतं. पण आता अचानक अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे संचालक मंडळ बरखास्त केल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
यावर आता खासदार संभाजीराजे यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘ज्या अण्णासाहेब पाटलांनी मराठा समाजासाठी बलिदान दिले, त्यांच्या नावाने असलेल्या महामंडळाचे नेतृत्व त्यांचेच चिरंजीव सक्षमपणे करत असताना, ते महामंडळ बरखास्त का केलं? सरकारचा तो अधिकार असेलही, पण ही वेळ नव्हती. समाजात याबाबत अक्रोश निर्माण झाला आहे’. असा संताप संभाजीराजे यांनी व्यक्त केला आहे.
ज्या अण्णासाहेब पाटलांनी मराठा समाजासाठी बलिदान दिले, त्यांच्या नावाने असलेल्या महामंडळाचे नेतृत्व त्यांचेच चिरंजीव सक्षमपणे करत असताना, ते महामंडळ बरखास्त का केलं? सरकारचा तो अधिकार असेलही, पण ही वेळ नव्हती. समाजात याबाबत अक्रोश निर्माण झाला आहे.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) November 10, 2020
महत्वाच्या बातम्या
- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे संचालक मंडळ बरखास्त…
- सुटकेसाठी अर्णबची आता सर्वोच्च न्यायालयात धाव
- ‘राहुल गांधी यांनी ज्याच्या सोबत हात मिळवले ते सर्व बुडाले’
- सरपंच असावा तर असा, संपूर्ण गावाचीच दिवाळी केली गोड़
- एसटी कर्मचाऱ्यांचे पूर्ण थकीत वेतन दिवाळीपूर्वीच, एसटीसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
