Share

सुटकेसाठी अर्णबची आता सर्वोच्च न्यायालयात धाव

Published On: 

मुंबई : अन्वय नाईक प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. या प्रकरणी रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला अटक केली आहे. काल अर्णबच्या जामीनावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने दिलासा न देता न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या अलिबाग सत्र न्यायालयात जामीनासाठी पुन्हा याचिका दाखल करण्यास सांगितले.

अर्णबच्या जामीनावरून काल(सोमवारी) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. काल देखील अन्वय नाईक प्रकरणातील तिन्ही आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. हे प्रकरण न्यायालयीन कोठडीचं असून उच्च न्यायालय त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. ज्या न्यायालयाने ही कोठडी सुनावली आहे त्या अलिबाग सत्र न्यायालयात यावर पुन्हा याचिका करावी असं कोर्टाने सांगितलं आहे. उच्च न्यायालयात जामीन दिल्यास ते बेकायदेशीर ठरेल असा निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे.

यानंतर, अर्णब गोस्वामींचा तळोजा कारागृहातील मुक्काम वाढला असून त्याच्या अडचणीत आणखी भर पडत आहे. तर, खुद्द राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना थेट फोन करून अर्णबची चिंता व्यक्त केली होती. आता, मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन नाकारल्यानंतर उच्च न्यायालयाच्या या आदेशाविरोधात अर्णब यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून अर्णब यांना दिलासा मिळतोय का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!